उपवासाचे मंच्युरियन

उपवासाचे मंच्युरियन

जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम

 

नवरात्री म्हटले की उपवास आले आणि उपवास म्हटले की सर्वांच्या तोंडात एकाच पदार्थाचे नाव असते, ते म्हणजे साबुदाण्याची खिचडी. पण, उपवासातही खवय्यांना विविध पदार्थांचे आस्वाद घेता यावे म्हणून घेऊन आलो आहे उपवासाचे मंच्युरियन.   

 

साहीत्य

 

½ वाटी लाल भोपळा

½ वाटी गाजर

2 चमचे आलेमिरची भरड

1 वाटी उपवासाची भाजणी

तेल तळायला

तीळ

मीठ चवीनुसार

सॉससाठी साहीत्य

लाल द्राक्षे 7–8

कोकम आगळ

ब्राऊन शुगर 1 चमचा

काळीमिरी

 

 

कृती: =प्रथम एका बाऊल मध्ये किसलेला भोपळा, किसलेलं गाजर, आलं-मिरचीची भरड, उपासाची भाजणी आणि चवीनुसार मीठ घालुन एकत्र करुन घ्या. नंतर त्यात थोडंसं पाणी घालुन मिश्रण घट्ट मळुन घ्या. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करुन तळुन घ्या.

 

 

नंतर पॅनमध्ये लालद्रक्षाची पेस्ट, कोकम आगळ, ब्राऊन शुगर घालुन परतवुन घ्या. वरुन आलं-मिरचीचा ठेचा व मीठ घालुन पुन्हा परतवुन घ्या. तयार सॉसमध्ये मंच्युरियन घालुन वरुन भाजणीचे पीठ आणि तीळ टॉस करुन घ्या. अश्याप्रकारे उपवासाचे मंच्युरियन तयार.   

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version