आमदार मंदा म्हात्रेंच्या पाठपुराव्याला यश; नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळाला मोठ दिलासा

आमदार मंदा म्हात्रेंच्या पाठपुराव्याला यश; नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळाला मोठ दिलासा

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची वडिलोपार्जित आणि गरजेपोटी बांधलेली घरे नियमीत होण्याचा मार्ग सुकर झालाय. आता त्यांच्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळणाराय.

नवी मुंबईतील 29 गावांमधील प्रकल्पग्रस्तांना याचा लाभ होणार असून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी 29 गावांचा सर्वे केल्यानंतर हे कार्ड माळणार आहे.

1972मध्ये नवी मुंबईतील 29 गावाची शेतजमीन सिडकोने  घेतली,  पण मूळ गावठाने तशीच ठेवली. मूळ गावठाने आणि प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या शेतजमिनीवर बांधलेली गरजेपोटी घरे तसेच वडीलो पार्जित घरांची पुनर्बाधणी करण्यास महापालिका तयार नव्हती.

जागेचे मूळ मालक असून देखील जुन्या घरांच्या जागेवर नवीन घर बांधल्यास ते अनधिकृत ठरवले जात आहे.  यासाठी हे प्रॉपटी कार्ड महत्वाचे आहे. प्रकल्पग्रस्तांना  प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी आमदार मंदा म्हात्रे सरकारकडे  सातत्याने  पाठपुरावा करत होत्या.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version