जय महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर
अल्पवयीन मुलीवर रुग्णवाहिकेत बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरात उघडकीस आलाय. मुलीला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने तिच्याच परिसरातील व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. राहुल जाधव असे या आरोपीचे नाव आहे. राहुल हा रिक्षाचालक असून पीडित मुलीचे आईवडील त्याच्या रिक्षातून ये-जा करत असत, त्यातून त्यांची ओळख झाली.
काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी आजारी असल्याने तिच्या आईवडिलांनी रुग्णवाहिका बोलावली. राहुल जाधव या रुग्णवाहिकेतून मुलीसोबत गेला. त्याने अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध दिले आणि रुग्णवाहिकेतच बलात्कार केला. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. तिच्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.