युवकाचा तृतीयपंथीयाशी विवाह

युवकाचा तृतीयपंथीयाशी विवाह

पहिल्या पत्नीच्या मृत्युनंतर युवकाने तृतीय पंथीयाशी विवाह केल्याची घटना नांदेडमध्ये घडलीय. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बोधडी या गावात हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.

हिमायतनगर येथे राहणाऱ्या राजू हनवते ने तृतीयपंथीयाशी विवाह केला. काही दिवसापूर्वीच राजूच्या पत्नीचे निधन झाले होते, पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुलं आहेत. आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी राजूने परंपरा झुगारत हे लग्न केलं आहे. मोलमजूरी करणाऱ्या राजूची रेल्वे प्रवासादरम्यान तृतीयपंथी हसीनाशी भेट झाली. दररोज होऊ लागलेल्या भेटीमुळे दोघांमध्ये मैत्री जमली. पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. राजूने हसीनाला लग्नाची मागणी घातली. हसीनाने त्याला होकारही दिला.

त्यानंतर बोधड़ी इथे राहणारे सरपंच मारोती शिंगारे यांनी पुढाकार घेत त्यांचे लग्न लावून दिले. या लग्नामुळे हसीना आणि राजू दोघंही खूप आनंदी आहेत. या अनोख्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय आणि दोघांचं कौतुकही होतंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version