जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईच्या अंधेरीत महिलेचा पाठलाग करणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नितीन शर्मा असं या आरोपीचं नाव आहे.
अंधेरीच्या आंबोली परिसरात त्यानं एका महिलेचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केला. घाबरलेल्या महिलेनं त्याला घराजवळून जायला सांगितलं तरीही तो गेला नाही अखेर
महिलेनं प्रसंगावधान राखत त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले.
तसेच पोलिसांकडे तक्रारही केली. पोलिसांनीही तक्रारीची गंभीर दखल घेत 24 तासात आरोपीला अटक केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.