भाजीत मीठ झाले जास्त, पत्नीचे केसच कापून टाकले

भाजीत मीठ झाले जास्त, पत्नीचे केसच कापून टाकले

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

भाजीत मीठ जास्त झाल्याने संतापलेल्या पतीनं पत्नीचे केस कापल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडलीय. याप्रकरणी पीडित महिलेने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. जेवत असताना असिफला भाजीत मीठ जास्त असल्याचे जाणवले. यावरून तो संतापला आणि त्याने पीडितेला लाथाबुक्क्यानं मारहाण करण्यास सुरुवात केली.

इतक्यावरच तो थांबला नाही तर त्यानं कात्रीनं पीडित महिलेचे केस कापून टाकले. दरम्यान याप्रकरणी आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा वचक राहिलेला नाही हे स्पष्ट होते. राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होतोय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version