२२ जुलै, २०२४ हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुंजाजी शिंदे (वय २७ वर्षे) असे मयत युवकाचे नाव आहे. आपल्या राहत्या घरातच त्याने गळफास घेतला आहे. सोमवारी २२ जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, 'मला काही कामधंदा नाही, मराठ्याला आरक्षण नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे, अशा आशयाची चिठ्ठी या युवकाच्या खिशात सापडली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.