नाव ‘ममता’ पण तिने केले हैवानालाही लाजवेल असे कृत्य; तिचा प्रताप ऐकून हादरा बसेल

नाव ‘ममता’ पण तिने केले हैवानालाही लाजवेल असे कृत्य; तिचा प्रताप ऐकून हादरा बसेल

जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी

 

भिवंडीत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका आईने प्रियकरांच्या साथीनं आपल्या 14 महिन्याच्या मुलाची गळा दाबून हत्या केली आहे.

धक्कादायक म्हणजे त्याला गाडूनही टाकलं. वडिलांना आपलं बाळ न दिसल्यानं विचारणा केली असता तो मेला होता, म्हणून त्याला गाडलं असं निर्दयी उत्तर महिलेनं दिलं.

नवऱ्याला संशय आला असता त्यानं याची पोलिसात तक्रार दिली. पोलिसांना चौकशी दरम्यानं या महिलेनं आपला गुन्हा कबूल केला. ममता यादव असं या निर्दयी आईचं तर राकेश कुमार असं तिच्या प्रियकराचं नाव आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version