जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईच्या मालवणी परिसरात एका शिक्षकानं दुसऱ्या शिक्षकाची हत्या केल्याची घटना घडलीय. आपल्या ट्युशन क्लासमधील मुले दुसऱ्या ट्युशन क्लासमध्ये शिकायला गेल्याच्या रागातून एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाची हत्या केल्याच्या प्रकार घडला आहे.
मालाड मालवणी परिसरातील अबुजवाडीमध्ये विजय नावाच्या शिक्षकाचा खासगी क्लास आहे.
त्याच्या क्लासमधील इतर शिक्षकांनी समोरच असणाऱ्या अरुप बिश्वास यांच्या क्लासमध्ये शिकवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्याच्या क्लासमधील अनेक मुलं ही अरुप यांच्या क्लासमध्ये जात होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.