‘स्वदेश दर्शन’मध्ये सिंधुदुर्गची निवड

‘स्वदेश दर्शन’मध्ये सिंधुदुर्गची निवड

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

पर्यटन क्षेत्रात देशाचं नावलौकीक होण्यासाठी पर्यटनस्थळ विकसित करण्याचं धोरण शासनाकडून राबवण्यात येत आहे.

 

अशातच केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत सिंधुदुर्गच्या कोस्टल सर्किटची निवड करण्यात आली आहे.

 

त्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून 82 कोटी 17 लाख रुपयांच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली.

 

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण आणि वेंगुर्ले तालुक्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार आहे.

 

सिंधुदुर्गसाठी आलेल्या या निधीचा आकडा पाहता येत्या दोन वर्षात जिल्ह्यातील पर्यटनात आमूलाग्र बदल होण्याची चिन्हं दिसत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version