अन्न व औषध प्रशासन मंत्री नव्हे, तर FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या त्यांच्या धडक कारवाईमुळे घराघरात पोहोचले आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर त्यांनी चांगलाच बडगा उगारला आहे. त्यांच्या या कामाचे सामान्य नागरिकांसोबतच आता बॉलिवूड कलाकारांकडूनही कौतुक होत आहे.
‘वेलकम’ फेम अभिनेत्री मल्लिका शेरावतने आयुक्त तुकाराम मुंढे यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानले आहेत. त्यांच्या कठोर कारवाईमुळे सर्वसामान्यांना निरोगी आणि सुरक्षित अन्न मिळत असल्याचे तिने म्हटले आहे.
मल्लिका शेरावत काय म्हणाली?
“तुम्ही जे काम केलं ते छान केलं तुकाराम जी, तुमच्यामुळे मी आता निर्धास्त होऊन जेवू शकते, कारण मला माहितीय आपली कडक नियमावली, आपली मूल्ये ही आम्हाला सुरक्षित ठेवत आहेत. आपल्या नजरेखालून कोणताच भेसळीचा प्रकार सुटू शकत नाही.”
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे राज्यभरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.