मलिक आणि देशमुखांची उच्च न्यायालयात धाव

मलिक आणि देशमुखांची उच्च न्यायालयात धाव

आज राज्यसभेसाठी विधानभवनात मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात राज्यसभेसाठी जागा सहा आणि उमेदवार सात रिंगणात उतरले आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. दरम्यान, देशमुख आणि मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला. त्यामुळे राज्यसभेसाठी राष्ट्रवादीला दोन मतांचा फरक पडतो. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी उच्च न्ययालयात धाव घेतली असून उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी भूमिका आखणार आहे.

अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेत अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार असून त्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करत या दोघांनी कोर्टात अर्ज केला होता. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही कोठडीत असल्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार न्यायालयाने नाकारला आहे.

राष्ट्रवादीने मतांचा कोटा बदलला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारासाठी मतांचा कोटा बदलला आहे. राष्ट्रवादीने ४२ मतांचा कोटा ४४ केला आहे. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठीचा उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी पवारांनी मतांचा कोटा बदलला आहे.

मतांचं गणित आहे तरी कसं?

राज्यसभेची निवडणूक विजयी होण्यासाठी उमेदवाराला ४२ मतं लागणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे दोन नेते अटकेत असल्यामुळे राष्ट्रवादीची दोन मतं कमी झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने ४२ मतांचा असलेला कोटा ४४ केला आहे.

दरम्यान, आता देशमुख आणि मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादी रणनिती आखणार आहे. तसेच न्यायालयाने मलिक आणि देशमुख यांच्या बाजूने निकाल लागल्यास ही दोन मते कोणाच्या पारड्यात पडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच, काँग्रेसनेही मतांचा कोटा वाढवला असल्यामुळे शिवसेनेची गोची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मलिक आणि देशमुखांची मते शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version