पूर्वजांनी नावारूपास आणलेली कला पुनर्जिवित

पूर्वजांनी नावारूपास आणलेली कला पुनर्जिवित

जय महाराष्ट्र न्यूज, मालेगाव

पूर्वीच्या काळी करमणुकीची साधने नव्हती. तेव्हा बोहाडा ,भजन ,कीर्तन ,गोंधळ जागरण असे लोकोत्सव मोठ्या उत्सहात साजरे केले जात होते. त्यात आदिवासी व खान्देश भागात बोहाडा उत्सवाची मोठी परंपरा आहे. मात्र, काळाच्या ओघात मोबाईल, ईंटरनेट व दूरचित्रवाणीसारखी साधने वाढल्याने बोहाडा ही कला लोप पावत चालली असली तरी कसमादे,खानदेशसह उत्तर महाराष्ट्रात मात्र बोहाडा हा कला प्रकार आजही अनेक गावांमध्ये टिकून आहे.

ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी तरुण पिढी प्रयत्न करत आहे. या उत्सवासाठी लागणारे मुखवटे बनविण्याची कला खामखेडा गावातील ठाकूर समाजातील कै रायसिंग ठाकूर यांच्या घराण्यात होती. त्यानंतर वडिलोपार्जित परंपरा टिकून राहवी म्हणून या चौथ्या पिढीतील धर्मा पवार ठाकुर व त्यांचा पुतण्या सुभाष ठाकुर मुखवटे बनवितात. धर्मा पवार हे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात कळवण आगारात चालक या पदावर कार्यरत आहेत.

वडिलोपार्जित मुखवटे बनविन्याच्या परंपरेने थोडा का होईना आर्थिक हातभार लागेल म्हणून धर्मा पवार हे फावल्या वेळेत मुखवटे बनविण्याचे काम करतात. धर्मा पवार मुखवट्याच्या आकाराचा साचा तयार करत त्यावर मेथीच्या पीठातील कागदाचा लगदा लावतात. या लगद्यावर ज्या देवतांचे मुखवटे बनवायचे आहेत त्या आकारानुसार आकर्षक रित्या लगदा लावत त्यात नाक डोळे,कपाळ यांचा आकार दिला जातो. मुखवटा परिपूर्ण झाल्यावर साजेसा रंग दिला जातो. पूर्वजांनी नावारूपास आणलेली कला पुनर्जीवित केल्याचा ठाकूर बंधूंना समाधान आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version