शनायाला भेटला तिचा दुसरा गॅरी, रेवतीनेही केली दोघांसोबत धमाल

शनायाला भेटला तिचा दुसरा गॅरी, रेवतीनेही केली दोघांसोबत धमाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया म्हणजेच रसिका सुनीलला तिचा दुसरा गॅरी मिळाला आहे आणि तो गॅरी दुसरा-तिसरा कोणीही नसून ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेच्या कन्नड व्हर्जनचा गुरुमुर्ती अर्थात भवानी सिंग आहे. भवानीने सिंगने रसिका आणि मालिकेतील रेवती म्हणजेच श्वेता मेहेंदळे आणि रसिकासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

यात हे तिघेही एका रेस्टॉरंटमध्ये पान शॉटचा आनंद घेत आहेत. गुरुमुर्ती अर्थात भवानी सिंग ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचे कन्नड व्हर्जन ‘सुब्बुलक्ष्मी सम्सारा’ या मालिकेत गॅरीची भूमिका करत आहे. काही दिवसांपूर्वी भवानीने मालिकेच्या सेटवर सर्वांना भेट दिली होती.

 

भवानी सिंगने त्यावेळी दिलेल्या भेटीचा फोटो आता throwback म्हणत शेअर केला आहे. मराठी मालिकेप्रमाणेच कन्नड मालिका ‘सुब्बुलक्ष्मी सम्सारा’ या मालिकेलाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version