निवडणुकीच्या तोंडावर भाजपात मोठे फेरबदल

निवडणुकीच्या तोंडावर भाजपात मोठे फेरबदल

सध्या राजकारणात अनेक बदल होत आहेत. पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ८ आमदार यांनी भाजपा आणि शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक बदल होताना दिसत आहे. आता भाजपादेखील निवडणुकीच्या तोंडावर अनेक बदल आणि जबाबदाऱ्या वाटून दिल्या जात आहेत. आगामी निवडणुकीत बहुमताने निवडून येण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून भाजप जिल्हाध्यक्षांची नवी टीम घोषित करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गटाचे ७० नवे शिलेदार घोषित करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून जिल्हाध्यक्षपदी तरूण चेहऱ्यांना संधी दिली जात आहे.

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांचा नवा गट जाहीर करण्यात आला आहे. अ‍ॅड. हर्षल प्रमोद पाटील यांची भाजपा भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. अनेक नव्या आणि युवा तरुणांना महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून जिल्हाध्यक्षपदी तरूण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांचा नवा गट जाहीर करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version