महेश आहेरची सीआयडी चौकशी होणार

महेश आहेरची सीआयडी चौकशी होणार

ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची सीआयडी चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महेश आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप पुन्हा एकदा समाज माध्यमांवर प्रसारित झाली. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला धमकी दिली असल्याचा आरोपही आहेर यांच्यावर आहे. त्यामुळे महेश आहेरांविरोधात आव्हाड आक्रमक झाले.

महेश आहेर या अधिकाऱ्याला प्रचंड माज असल्याचे आव्हाड म्हणाले. याच्यासंदर्भातील आम्ही ८ तासात ऑडीओ क्लिप बाहेर काढल्याचे देखिल आव्हाड म्हणाले. तसेच याबाबत अजून अनेक बाबी उघड होतील. त्याने माझ्या मुलीला धमकी दिली. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो आहे. मात्र अजूनही त्या अधिकाऱ्यावर कोणताही कारवाई करण्यात आलेली नाही, असेही आव्हाड म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version