Mahayuti Protest : महायुतीचं शक्तिप्रदर्शन! महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईत आज ‘जनआक्रोश मोर्चा’

Mahayuti Protest : महायुतीचं शक्तिप्रदर्शन! महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईत आज ‘जनआक्रोश मोर्चा’

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ एक कोटींहून अधिक सह्या गोळा करण्यासाठी राज्यव्यापी मोहिमेची घोषणा केली असून महायुतीच्या वतीने आज, मंगळवारी जनआक्रोश मोर्चा कारढण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक कोटी महिलांच्या सह्या गोळा करून विरोधी पक्षाला जनमताचा कौल दाखवला जाईल, असे काल मुख्यमंत्री म्हणाले. तसेच आम्ही अशी जनजागृती करू की विरोधी पक्षाला हे विधेयक मान्य करून त्याच्या समर्थनार्थ येण्यास भाग पडेल. जोपर्यंत महिलांना त्यांचे हक्काचे स्थान मिळत नाही, तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यानुसार भाजप या विधेयकाच्या समर्थनार्थ निदर्शन करणार असून महायुतीमधील सर्व मित्रपक्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील आपापल्या स्तरावर जनजागृती मोहीम राबवणार आहेत.

हेही वाचा : Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात दुहेरी संकट! कुठे उष्णतेच्या लाटा तर कुठे मुसळधार पावसासह गारपीटीचा इशारा; पुढील 3 तास महत्त्वाचे, प्रशासन सतर्क

नेमकं काय घडलं –

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर
मंजुरीसाठी 360 मतांची गरज होती
298 बाजूने, 230 विरोधात मतं पडली
महायुतीकडून तीव्र प्रतिक्रिया
21 एप्रिलला मुंबईत भव्य मोर्चा
जांबोरी मैदान ते वरळी डोम मार्ग
वरळी डोममध्ये जाहीर सभा होणार
मोर्चात पुढील भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version