विधानसभा निवडणुका काही दिवसांवरच ठेपल्या असून महायुतीने आज पत्रकार परिषद घेत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला आहे. मित्र पक्षांना 14 तर शिवसेनेला 124 आणि भाजपाला 150 असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याबाबत आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन केले असून निवडून येणार असल्याचे म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासपRPI, शिवसंग्राम आणि रयत यांची महायुती आहे.
हिंदुत्वाचा धागा हा भाजप शिवसेनेला जोडणारा आहे.
महायुती करण्यासाठी सर्वच पक्षांनी तडजोड केली.
ज्यांनी बंडखोरी केली त्यांना पुढच्या दोन दिवसात त्यांचे अर्ज मागे घ्यायला लावणार.
तसेच राज्यात कुठेही बंडखोरी राहणार नाही.
बंडखोरी करणाऱ्यांना महायुतीत स्थान नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.