जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
जगभरातील समस्त शिवप्रेमींसाठी महत्त्वाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी व सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्री निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्तांनी श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्द्दी केली होती.
शिव लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्री पासूनच लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. तर अंबरनाथच्या शिवमंदिरातही लोकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये शंकराच्या पिंडीला फेटा बांधून सजवण्यात आलं होतं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.