Mahashivratri 2026 : 15 फेब्रुवारीला महादेवांची विशेष कृपा! ध्यानावस्थेतून बाहेर येणार भोलेनाथ; मनोकामनापूर्तीसाठी करा ‘हा’ सोपा उपाय

पौराणिक मान्यतेनुसार, महादेव नेहमी ध्यानमग्न असतात; परंतु, महाशिवरात्रीच्या या पवित्र मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यानावस्थेतून बाहेर येतात. या वेळेस त्यांचे पूजन करणे लाभदायी ठरते.
Mahashivratri 2026 : 15 फेब्रुवारीला महादेवांची विशेष कृपा! ध्यानावस्थेतून बाहेर येणार भोलेनाथ; मनोकामनापूर्तीसाठी करा ‘हा’ सोपा उपाय

Mahashivratri 2026 Remedies: यंदाची महाशिवरात्री केवळ एक सण नसून आध्यात्मिक शक्तीचा मोठा स्रोत ठरणार आहे. रविवार, 15 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी होणारी महाशिवरात्री अनेक अर्थांनी विशेष आहे. या दिवशी 'सर्वार्थसिद्धी' आणि 'अमृतसिद्धी' हे दोन अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग एकत्र येत आहेत. ज्योतिषशास्त्रात या योगांना कोणतेही कार्य सिद्ध करण्यासाठी आणि इच्छापूर्तीसाठी सर्वोत्तम मानले जाते. या विशेष मुहूर्तावर महादेवांची कृपा कशी मिळवावी, याविषयी खास उपाय जाणून घेऊ..

महादेवांच्या जागृत-अवस्थेचा लाभ घ्या
पौराणिक मान्यतेनुसार, महादेव नेहमी ध्यानमग्न असतात; परंतु, महाशिवरात्रीच्या या पवित्र मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यानावस्थेतून बाहेर येतात. या दिवशी शिव अत्यंत जागृत अवस्थेत असतात, त्यामुळे भक्ताने केलेली थोडीशी सेवा आणि आर्त साद थेट महादेवांपर्यंत पोहोचते. ज्या दांपत्यांना संतान सुखाची अपेक्षा आहे किंवा ज्यांच्या मनात काही विशेष इच्छा आहेत, त्यांच्यासाठी हा दिवस सुवर्णसंधी मानला जात आहे.

हेही वाचा – Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला शिवकृपा हवी? 'या' वेळेत करा जलाभिषेक, जाणून घ्या शुभ मुहूर्त

इच्छापूर्तीसाठी विशेष विधी
तुमच्या मनातील कोणतीही शुभ इच्छा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी उपाय जाणून घ्या..
अभिषेक : सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर पांढरी फुले आणि बेलपत्रे शिवलिंगावर 108 वेळा अर्पण करत पाण्याचा अभिषेक करावा.
दही-भाताचा नैवेद्य : महादेवांना दही-भात अत्यंत प्रिय आहे. अभिषेकानंतर मनोभावे दही-भाताचा नैवेद्य अर्पण करावा.
संकल्प : विधी पूर्ण झाल्यावर आपली इच्छा किंवा मनोरथ महादेवांसमोर स्पष्टपणे आणि श्रद्धेने मांडावे. संतानप्राप्तीसाठी इच्छुक असल्यास ही इच्छाही तुम्ही महादेवांना सांगू शकता.

दिवसभराची साधना आणि शिष्टाचार
महाशिवरात्रीचा दिवस यशस्वी करण्यासाठी केवळ पूजा पुरेशी नसून दिवसभराचे आचरणही महत्त्वाचे आहे. या दिवशी पूर्ण दिवस उपवास करावा आणि कपाळावर भस्म धारण करावे, जे शिवाला अत्यंत प्रिय आहे. दिवसभर 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप किंवा महादेवाचे चिंतन करावे. या साध्या वाटणाऱ्या पण शास्त्रशुद्ध उपायांनी तुमची वर्षानुवर्षांची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीला मंदिरातून घरी आणा 'या' 3 वस्तू; नेहमी सुख-समृद्धी नांदेल, तिजोरी राहील सदैव भरलेली 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version