Maharashtra Weather Update: राज्यात थंडीचा कडाका वाढणार की पावसाचे संकट? हवामान विभागाचा नवा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना हाय-अलर्ट

काही जिल्ह्यांत तापमान घसरले असून महानगरांमध्ये प्रदूषणाने धोका वाढवला आहे. हवामान विभागाने पुढील दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Maharashtra Weather Update: राज्यात थंडीचा कडाका वाढणार की पावसाचे संकट? हवामान विभागाचा नवा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना हाय-अलर्ट

मुंबई: सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत झाले असले, तरी हवामानातील लहरीपणा अजूनही कायम आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे देशाच्या उत्तर भागात कडाक्याची थंडी पडली असतानाच, महाराष्ट्रातील तापमानातही मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या अवकाळी पावसानंतर आता राज्यावर ढगाळ हवामानाचे सावट असून, पुढील काही दिवसांत थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

राज्यात कुठे थंडी, कुठे ढगाळ वातावरण?

राज्यात सध्या थंडीचा कडाका संमिश्र स्वरूपाचा आहे. धुळे जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्वात नीचांकी म्हणजेच 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून, येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा थोडा कमी झाला असला, तरी पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहून त्यानंतर थंडी पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Mumbai Municipal Corporation Election 2026 : मनसेला आणखी एक धक्का! वॉर्ड क्रमांक 194 नाकारणं राज ठाकरेंना पडलं माहागात; भाजप प्रवेश कन्फॉर्म

मुंबई आणि दिल्लीत ‘प्रदूषण’ ठरतेय जीवघेणे

हवामानासोबतच मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. श्वसनाचे विकार असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, डॉक्टरांनी नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. दिल्लीतही परिस्थिती बिकट असून, तेथील वाढत्या प्रदूषणामुळे शाळांना ऑनलाईन वर्ग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनासमोर या प्रदूषणाला रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

उत्तर भारतात शीतलहरींचा तडाखा

उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका असह्य झाला असून दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज, 6 जानेवारी रोजी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने उत्तर भारतातील 15 जिल्ह्यांमध्ये शीतलहरीचा ‘डेंजर’ अलर्ट जारी केला असून, किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील तापमानातही येत्या काळात सातत्याने बदल होताना दिसतील.

जानेवारी महिनाभर हुडहुडी कायम राहणार

हवामान तज्ज्ञांच्या मते, संपूर्ण जानेवारी महिना राज्यात थंडीचा प्रभाव कायम राहील. जरी सध्या काही भागांत गारठा कमी झाला असला, तरी उत्तरेकडील थंड वारे सक्रिय झाल्यामुळे पुन्हा एकदा किमान तापमानाचा पारा घसरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी बदलत्या हवामानानुसार आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. ढगाळ वातावरण आणि थंडीचा हा खेळ किमान आठवडाभर सुरू राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Mumbai Local Train: लोकल प्रवाशांना मोठा फटका; मंगळवार-बुधवारी 215 फेऱ्या रद्द, पाहा काय आहे नेमकी वेळ?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version