Maharashtra School Holidays: अभ्यासाला ब्रेक, पतंगबाजीत रंगणार मुलं; निवडणुकांमुळे प्रशासनाकडून शाळांना मोठं सुटीचं पॅकेज जाहीर

राज्यातील विविध शहरातील अनेक नामांकित शाळांनी मंगळवारपासूनच पालकांना व्हॉट्सॲप ग्रुप आणि ईमेलद्वारे सुटीच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे.
Maharashtra School Holidays: अभ्यासाला ब्रेक, पतंगबाजीत रंगणार मुलं; निवडणुकांमुळे प्रशासनाकडून शाळांना मोठं सुटीचं पॅकेज जाहीर

मुंबई: राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या धामधुमीत आता राज्यातील बहुतांश शहरांमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासातून मोठा ब्रेक मिळणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाकडून अनेक शाळांचा ताबा घेण्यात येणार असल्याने, विद्यार्थ्यांना मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सलग चार ते पाच दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक केंद्रांमुळे मिळाला दिलासा

महानगरपालिका प्रशासनाने मतदान, मतमोजणी आणि या प्रक्रियेच्या पूर्वतयारीसाठी शहरातील अनेक खाजगी आणि सरकारी शाळांची निवड केली आहे. मतदानासाठी लागणारी यंत्रणा, ईव्हीएम मशीनची सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासाठी शाळेचा परिसर वापरला जाणार आहे. यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळा येऊ नये, म्हणून प्रशासनाने या शाळांना सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: Crime News : महाराष्ट्र ते झारखंड व्हाया बांगलादेश; निवडणुकीच्या तोंडावर बनावट नोटांच्या तस्करीचा पोलिसांकडून पर्दाफाश

असे असेल सुट्यांचे गणित

यावेळी सुट्यांचे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी 'जॅकपॉट' ठरले आहे. 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीची सार्वजनिक सुटी आहे. त्यानंतर 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. प्रशासकीय कामाची व्याप्ती लक्षात घेता 17 जानेवारीलाही अनेक शाळा बंद राहणार आहेत. ज्या शाळांना शनिवार आणि रविवारची सुटी असते, त्यांच्यासाठी तर ही सुटी अक्षरशः मोठी आनंदाची बातमी असणार आहे.

पालकांना सूचना देण्यास सुरुवात

राज्यातील विविध शहरातील अनेक नामांकित शाळांनी मंगळवारपासूनच पालकांना व्हॉट्सॲप ग्रुप आणि ईमेलद्वारे सुटीच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे. "मतदान केंद्र आणि निवडणूकविषयक कामांसाठी शाळेचा परिसर उपयोगात आणला जाणार आहे, त्यामुळे 14 ते 17 जानेवारी या कालावधीत नियमित वर्ग भरणार नाहीत," अशा आशयाचे मेसेज शाळांकडून पाठवले जात आहेत. 

विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

या सुटीच्या बातमीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. परीक्षेच्या ताणापूर्वी मिळालेली ही छोटी 'व्हॅकेशन' मुलांसाठी नक्कीच रिफ्रेशिंग ठरणार आहे. विशेष म्हणजे, मकरसंक्रांतीच्या सणासोबतच या सुट्या आल्याने पतंगबाजी आणि सणाचा आनंद द्विगुणित होणार आहे. पालकांनी सांगितले की, "शाळेचा परिसर निवडणुकीसाठी वापरला जाणार असल्याचा मेसेज आम्हाला मिळाला असून, सलग सुट्यांमुळे मुलांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये."

हेही वाचा: Weather Alert: राज्यात धुक्याची चादर! वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पुढील 3 दिवस मोठे हवामान बदल होणार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version