जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्रात प्रतिदिन किमान दोन व्यक्ती आपला धर्म बदलतात, असा तपशील माहिती अधिकारात उघड झाला आहे. भारतीय राज्य घटनेने धर्म बदलण्याचा अधिकार दिला असून त्यानुसार
अनेक जण अर्ज करतात. या संख्येत गेल्या तीन वर्षांत तिपटीने वाढ झाल्याचेही निदर्शनास आले आहे.
नाव तसेच जन्म दिनांक बदलण्यासोबतच किती जण धर्म बदलतात, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागितली होती.
त्यावेळी त्यांना 2014 ते 2016 या वर्षांतील आकडेवारी देण्यात आली. या माहितीनुसार, 2014 मध्ये 247 तर 2015 मध्ये 615 आणि 2016 मध्ये 797 नागरिकांनी धर्म बदलल्याचे
स्पष्ट झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.