Maharashtra Rain Red Alert: पुढील 3 तास धोक्याचे, नागरिकांना सावधानतेचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना जारी केला रेड अलर्ट

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चारही जिल्ह्यांसाठी पुढील 3 तासांसाठी 'रेड अलर्ट'  जारी केला आहे.
Maharashtra Rain Red Alert: पुढील 3 तास धोक्याचे, नागरिकांना सावधानतेचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना जारी केला रेड अलर्ट

राज्यभरात आता मान्सून सक्रिय होण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चारही जिल्ह्यांसाठी पुढील 3 तासांसाठी 'रेड अलर्ट'  जारी केला आहे.

ठाणे आणि सखल भागांमध्ये रात्रीभर झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पालिका प्रशासनाने तत्काळ पाणी उपसा करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर रोड तसेच कल्याण आणि नाशिक दिशेने जाणाऱ्या मार्गांवर वाहतूक मंद गतीने सुरू आहे.

हेही वाचा – Mumbai Local Train Update: मुंबईकरांनो लक्ष द्या! दादर–सायन–किंग सर्कल परिसरात साचलं पाणी; लोकल सेवा उशिराने, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही बदलले 

मुंबईमध्ये पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी 24 तासांत 200  मिमीपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा – Kirit Somaiya On Lonavala Crime : घाटकोपरच्या 16 वर्षीय तरुणीवर लोणावळ्याला नेऊन अत्याचार; किरीट सोमय्यांचा धक्कादायक दावा, "8 मुस्लिम 'गुंड'…" 

गेल्या 3 दिवसांपासून पालघरला पावसाने झोडपून काढले आहे. आजच्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version