अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. या शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. याचदरम्यान आता महत्वाची माहिती समोर आली आहे.
अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे अर्थ खाते होते. मात्र सुनेत्रा पवारांकडे कोणकोणते खातं जाणार? याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दरम्याने समोर आलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडामंत्री ही खाती देण्यात येणार आहेत.
हेही वाचा – ZP Election NCP Yuti : जिल्हा परिषद एकत्र लढण्यावर चर्चा, काका-पुतण्यामधील गुप्त बैठकीचा व्हिडीओ समोर
तसेच अजित पवार सांभाळत असलेले अर्थखातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांभाळणार आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुनेत्रा यांना अर्थखात ऐवजी ऊर्जा खात देण्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.