Amol Mitkari on Ajit Pawar pawar plane crash: अजित पवारांच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू पण 5 मृतदेह, अमोल मिटकरींनी उपस्थित केले मोठे सवाल

त्यातून अनेक धक्कादायक खुलासेदेखील करण्यात आले आहेत. 
Amol Mitkari on Ajit Pawar pawar plane crash: अजित पवारांच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू पण 5 मृतदेह, अमोल मिटकरींनी उपस्थित केले मोठे सवाल

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. घरातीलच कोणीतरी गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली. त्यांच्या मृत्यूने अनेक प्रश्नदेखील उभे राहिले. तपास यंत्रणांनी तपास सुरू केला. त्यातून अनेक धक्कादायक खुलासेदेखील करण्यात आले आहेत. 

अशातच आता अमोल मिटकरी यांनी दादांच्या अपघातावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. याबद्दल त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची. आणि दुसरी खुर्ची आदरणीय दादांची!

मृत्यूच्या एक दिवस आधी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही.
मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय. 

–  अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?
–  सहावी व्यक्ती कुठे गेली?
– Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
– एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???
– एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?
प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही.

दरम्याने आता अमोल मिटकरींच्या पोस्टवरून आता राजकिय क्षेत्रात आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version