राज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती

राज्यात पावसाची आठवडाभर विश्रांती

राज्यात गेल्या आठवडाभर कोसळणाऱ्या पावसाने शनिवारपासून थोडी विश्रांती घेतली असून पुढील आठवड्यात पाऊस पडणार नाही, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा उकाडा वाढला आहे.

सहारा भागातून येणा-या धूलिकणांमुळे सध्या ढगांच्या निर्मितीला पोषक स्थिती नसल्याने हा परिणाम जाणवत असल्याचे मत हवामान शास्त्रज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. राज्याच्या अनेक भागांत पुढील आठवडाभर अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

कोकण किनारपट्टीतही पावसाचं प्रमाण कमी झालं असून अनेक भागांमध्ये पूर्व मोसमी आणि मोसमी पाऊस झाल्यानं बहुतांश शेतक-यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र पावसाच्या आठवडाभराच्या विश्रांतीमुळे या शेतक-यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. सहारा भागातून येणा-या धूलिकणांचा परिणाम झाल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version