No Network No Vote : ‘नेटवर्क नाही, मत नाही!’, रत्नागिरी जिल्ह्यातील गावकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार

. मोबाईलला रेंज नाही, म्हणून आता गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
No Network No Vote : ‘नेटवर्क नाही, मत नाही!’, रत्नागिरी  जिल्ह्यातील गावकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार

एकीकडे आपण ‘डिजिटल इंडिया’च्या (Digital India) गप्पा मारतोय, ५-जी (5G) तंत्रज्ञानाने जग जवळ आणल्याचा दावा करतोय,पण दुसरीकडे स्वातंत्र्याच्या ७ दशकानंतरही एक गाव असं आहे जे आजही ‘नॉट रिचेबल’ आहे. मोबाईलला रेंज नाही, म्हणून आता गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. “नेटवर्क नाही, तर मतदान नाही!” असा आक्रमक पवित्रा घेत तलवडे ग्रामस्थांनी आगामी निवडणुकीवर थेट बहिष्कार टाकला आहे. 

तळवडे गावात मोबाईलची रेंज शोधण्यासाठी तरुणांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना थेट डोंगर गाठावा लागतो.शहरापासून अवघ्या २२ किलोमीटरवर असूनही हे गाव डिजिटल युगात अंधारात चाचपडतंय. म्हणूनच, आता इथल्या ८५० मतदारांनी एकमुखी निर्णय घेतला आहे ‘आधी टॉवर, मगच मत!’

निवडणुकांच्या वेळी गावात अनेक पुढारी नेतेमंडळी येतात मात्र या नेतेमंडळींकडं वारंवार मागणी करून समस्या मांडूनही गावात आजवर नेटवर्क नाही त्यामुळे गावकऱ्यांनी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या निवडणुकीच्या उत्सवावर बहिष्कार टाकला आहे.त्यामुळं आता तरी प्रशासनाला जाग येईल का हे पाहावं लागणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version