महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवजयंती साजरी 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवजयंती साजरी 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती सर्वत्र साजरी होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. मुंबईसह राज्यात मनसेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिवाजी पार्कमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.

मुंबईतील शिवाजी पार्क येथीळ शिवतीर्थावर मनसेकडून शिवजयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. राज ठाकरे यांन शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी जमलेल्या सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तर राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शपथ दिली. तसेच शिवजयंती निमित्ताने राज्यात मनसेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंती सोहळ्या मुंबईतील शिवाजी पार्कात हजारो मनसैनिक उपस्थित होते. तर संपूर्ण परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version