Maharashtra Monsoon Update: खूशखबर! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात मान्सून होणार सक्रिय, हवामान विभागाने दिली माहिती

सामान्यांसह बळीराजा मोठ्या चिंतेत सापडला आहे. अशातच आता पावसाबद्दल मोठी अपडेट समोर आली
Maharashtra Monsoon Update: खूशखबर! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात मान्सून होणार सक्रिय, हवामान विभागाने दिली माहिती

जून महिना अर्धा उलटून गेला तरीही अजूनही मुंबईसह काही भागात पावसात आगमन झाले नाही. त्यामुळे सामान्यांसह बळीराजा मोठ्या चिंतेत सापडला आहे. अशातच आता पावसाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.  भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 24 ते 25 जूनपासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि मुंबईत पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. याशिवाय 25 ते 28 जूनदरम्यान किनारपट्टी भागात अतिवृष्टीचे ढग सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

आज 19 जून रोजी मुंबई, पालघर, रत्नागिरी ,नाशिक,जळगाव संभाजीनगर, जालना, बीड ,सोलापूर, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा ,गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला. रायगड धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version