जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी सुरू झालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर झालेत. यामध्ये भाजपा व शिवसेना प्रत्येकी २ जागांवर विजयी झाले असून राष्ट्रवादी १ जागेवर निवडून आले आहे.
अमरावतीत काँग्रेसला जबर धक्का मिळाला.कारण अमरावतीत काँग्रेसची स्वत:ची 128 मतं असताना काँग्रेस उमेदवाराला केवळ 17 मतं मिळाली.
दुसरीकडे नाशिकमध्ये शिवसेनेने बाजी मारली. पालघरचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या भाजपला हा मोठा दणका आहे.
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला.
परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचा विजय
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीत कमळ फुललं
विधानपरिषदेच्या पाच जागांचा निकाल आज जाहीर झाला असला तरी लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर पडली आहे.
या सर्व मतदारसंघात सोमवारी 21 मे रोजी मतदान झालं होतं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.