बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, 88.41 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, 88.41 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी बारावी परीक्षेचा निकाल 88.41 टक्के इतका लागला आहे.  मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट झाली असून यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. 

विभागनिहाय टक्केवारीचा विचार केल्यास दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणचा निकाल सर्वाधिक म्हणजे 94.85 %  लागला आहे. तर नाशिकचा निकाल मात्र सर्वात कमी  86.13 % लागला आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 12 जून रोजी सकाळी 11 वाजता गुणपत्रिकांचं वाटप करण्यात येईल.

बारावी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर

दहावीचा निकाल जाहीर…यावर्षीही मुलींनीच मारली बाजी

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version