Maharashtra Electricity Rate Increase : ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना वीजेचा ‘झटका’; महावितरणकडून वीजबिलात वाढ

महावितरण कंपनीने दिवाळीच्या मुहूर्तावर इंधन समायोजन आकारात वाढ केली आहे. घरगुती ग्राहकांसोबत औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांनाही त्याचा फटका बसणार आहे.
Maharashtra Electricity Rate Increase : ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना वीजेचा ‘झटका’; महावितरणकडून वीजबिलात वाढ

मुंबई: महावितरण कंपनीने दिवाळीच्या मुहूर्तावर इंधन समायोजन आकारात वाढ केली आहे. घरगुती ग्राहकांसोबत औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांनाही त्याचा फटका बसणार आहे. महावितरणने दावा केला आहे की महागडी वीजखरेदी केल्याचा खर्च वसूल करण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे आणि ती एक महिन्यासाठी असणार आहे. परंतु महागड्या वीजखरेदीचे वाढलेले प्रमाण आणि महावितरणची बिकट आर्थिक स्थिती बघता इंधन समायोजन आकारातील वाढ पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्य वीज नियामक आयोगापुढे पुढील पाच वर्षातील वीजदरांचा फेरप्रस्ताव सादर करुन वीजेचे दर कमी केल्याचा दावा महावितरणने केला होता. तसेच जुलैपासून नवीन दर लागू झाले होते. महावितरणने वास्तविक दरमहा 100 युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजदर कमी करुन अन्य ग्राहकांचे मात्र वाढविले होते. पुढील पाच वर्षात स्वस्त सौर ऊर्जेची उपलब्धता वाढल्यावर टप्प्याटप्प्याने हे दर कमी होणार आहेत. परंतु आता नवीन दर लागू झाल्यावर काही काळातच महागड्या वीजखरेदीपोटी इंधन समायोजन आकाराचा भार ग्राहकांवर लादण्यात आला आहे.

हेही वाचा: Gold-Silver Price Today: आजच्या बाजारात सोन्याचे दर घसरले, चांदीच्या भावात अचानक वाढ; जाणून घ्या

या माध्यमातून प्रति युनिट 95 पैशांपर्यंत दरवाढच केली आहे. दरमहा 100 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या घरगुती वीज ग्राहकांकडून प्रति युनिट 35 पैसे, 300 युनिटपर्यंत वापर असलेल्यांकडून 65 पैसे, 301 ते 500 युनिट वीज वापर करणाऱ्यांकडून 85 पैसे तर 500 युनिटपेक्षा अधिक वीज वापर असलेल्यांकडून 95 पैसे इंधन समायोजन आकार वसूल करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक वीजग्राहकांचे वीज दर कमी होतील, असे दावे महावितरण व राज्य सरकारकडून करण्यात आले होते. पण नवीन वीजदर लागू होताच काही महिन्यांतच इंधन समायोजन आकार वाढवून वेगळ्या माध्यमातून दरवाढ करण्याची पाळी महावितरणवर आली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version