राज्यात जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट?

राज्यात जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट?

कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी विविध बाबींचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्णसंख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्या कमी होते असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्णवाढ आपण रोखू शकलो, असे नमूद करताना निर्बंधांच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनांना दिल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version