राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटल्यामुळे तीन आठवड्यांपूर्वी शिथिल केलेले निर्बंध कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणूच्या (डेल्टा प्लस) प्रादुर्भावाचा धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. हे जुनेच निर्बंध सोमवारपासून राज्यात नव्याने लागू होणार आहेत.
मुंबईतील हे निर्बंध आणखी तीन महिने कायम ठेवण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर गर्दी झाल्याचे आणि नागरिक नियम पळत नसल्याचे सरकारला आढळले, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
कसे असतील निर्बंध? पाहूया
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.