गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुबंदीसाठी सूज्ञ लोकांनी पुढाकार घ्यावा- उच्च न्यायालय

गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुबंदीसाठी सूज्ञ लोकांनी पुढाकार घ्यावा- उच्च न्यायालय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुबंदीबाबत येथील सूज्ञ लोकांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केली.

 

राज्यात प्रत्येक रस्त्यावर दारुची 10 दुकानं आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे अशी टिपण्णी देखील मुंबई उच्च न्यायालयानं केली.

 

एलआयसीनं एका तंबाखू कंपनीत केलेल्या गुंतवणुकीविरोधात सुमित्रा पेडणेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयानं ही सूचना केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version