विधानभवनाच्या प्रांगणात महाआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
या तीनही पक्षाच्या एकूण 36 आमदारांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
यापैकी 26 आमदारांनी कॅबिनेट आणि 10 आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाविकासआघाडीचे एकूण 43 जणांचे मंत्रिमंडळ असणार आहे.
मुख्यमंत्री : उद्धव ठाकरे
उपमुख्यमंत्री : अजित पवार
राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री
दिलीप वळसे-पाटील
धनंजय मुंडे
अनिल देशमुख
हसन मुश्रीफ
राजेंद्र शिंगणे
नवाब मलिक
राजेश टोपे
जितेंद्र आव्हाड
बाळासाहेब पाटील
राष्ट्रवादीचे राज्यमंत्री
दत्तात्रय भरणे
आदिती तटकरे
संजय बनसोडे
प्राजक्त तनपुरे
काँग्रेसचे कॅबिनेटमंत्री
अशोक चव्हाण
के.सी. पाडवी
विजय वडेट्टीवर
अमित देशमुख
सुनील केदार
यशोमती ठाकुर
वर्षा गायकवाड
असलम शेख
काँग्रेसचे राज्यमंत्री
सतेज पाटील
विश्वजीत कदम
शिवसेनचे कॅबिनेटमंत्री
आदित्य ठाकरे
अनिल परब
उदय सामंत
संजय राठोड
गुलाबराव पाटील
दादा भुसे
संदीपन भुमरे
शिवसेनेचे राज्यमंत्री
बच्चू कडू
शंभुराजे देसाई
राजेंद्र पाटील
शामराव गडाख
अब्दूल सत्तार
बच्चू कडू आणि शामराव गडाख या आमदारांनी शिवसेनेला पाठींबा दिला आहे.
तसेच मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 28 नोव्हेंबरला शिवतिर्थावर पार पडला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत एकूण 6 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
शिवसेनेच्या सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली होती. तसेच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
तर राज्यपालांनी जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली होती.
दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार आज पूर्ण झाला आहे. येत्या 1 ते 2 दिवसात खातेवाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.