पुण्याजवळ सिग्नलमध्ये बिघाड करुन गाडी थांबवली नंतर चहा विकण्याच्या बहाण्यानं ते महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये घुसले अन्…

पुण्याजवळ सिग्नलमध्ये बिघाड करुन गाडी थांबवली नंतर चहा विकण्याच्या बहाण्यानं ते महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये घुसले अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये जेजुरी स्टेशनजवळ दरोडा घालण्यात आलाय. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली.

चोरट्यांनी सिग्नल नादुरुस्त करुन गाडी थांबवली. त्यानंतर चहा विकण्याच्या बहाण्यानं गाडीत चढून मोठी लूट केली.

गाडीमध्ये सुरक्षा बलाचे जवान नसल्यानं दरोडेखोरांच्या हातात आयतं कोलीतच मिळालं होते. त्यांनी संधीचा फायदा घेत सोनं, पैसे आणि मोबाईल यांची लूट केली आणि गाडीतून पळ काढला. याबद्दल 3 प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.  

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version