महाडिकांनी ‘राजाराम’चा गड राखला

महाडिकांनी ‘राजाराम’चा गड राखला

कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमाेजणीचा पहिला काैल हाती आला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमाेजणीस प्रारंभ झाला. अकरा वाजेपर्यंत सत्ताधारी महादेवराव महाडीक यांच्या गटाने उत्पादक गटात आघाडी मिळवली आहे. महादेवराव महाडिक यांना १२९ पैकी ८४ मते पडली आहेत. तर विरोधी परिवर्तन पॅनेलचे सचिन पाटील यांना ४४ मते पडली आहेत.

महाडिकांचे उमेदवार आघाडीवर

सत्ताधारी महाडिक गटाचे २१ पैकी ८ उमेदवार आघाडीवर होते. तिसऱ्या फेरीअंती महाडिक गटाचे विलास यशवंत जाधव २९३४, डॉ.मारुती किडगावकर ३१२९ आणि सर्जेराव पाटील (बोणे) ३०५१ मतांनी आघाडीवर आहेत. तर विरोधी पॅनलचे सतेज पाटील गटाचे बळवंत गायकवाड २१५८ मते, विलास पाटील २०६८ मते आणि विठ्ठल माने २३६१ मते पडली.

सहकाराने व्यापलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय पक्षांपेक्षा गटाला मोठे महत्त्व आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन राजकीय विरोधकांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version