जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कोकणात 3 ते 4 हजार मिलीमीटर पाउस दरवर्षी पडतो. वारंवार नद्यांना पूर येतात, मार्गावरची वाहतुकसुद्धा वाढली. अशा परिस्थतीत जुन्या पुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
गेल्या वर्षीच्या सावित्री नदी पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा कोकणातील एकूण 174 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 48 जुन्या पुलांचा समावेश आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ध्रुव कंसल्टन्सी ही खाजगी कंपनी संयुक्तपणे हे तपासणीच काम करणार आहे.
तज्ञ अभियंत्यांकडून हे तपासणीचे काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस धोकादायक पुलांची यादी समोर येणं अपेक्षित आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.