जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरहे लाखो पर्यटकांनी पसंती असते. पण त्यामुळेच महाबळेश्वरमध्ये कचऱ्याच साम्राज्य पसरलं होतं.
३ टन कचरा इथून काढण्यात आला. हा संपूर्ण कचरा साफ करायला नगरपालिका कर्मचा-यांना तब्बल ४-५ तास लागले. रात्री १ ते पहाटे पाचपर्यंत मेहनत घ्यावी लागली. वेण्णा लेकचा पारा ६ अंशावर घसरला असतानाही इतक्या कडाक्याच्या थंडीत कर्मचाऱ्यांनी सफाईचे काम केले.
पर्यटकांनी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात केलेल्या पार्ट्या दारुच्या बाटल्यांचा खच तेथे पडला होता.पालिकेच्या कर्मचा-यांनी चार ते पाच तासांत हा सगळा कचरा साफ करून नववर्षाचं स्वागत साफसफाई करत आणि स्वच्छतेचा संदेश देत केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.