मध्य प्रदेश: ट्रक नदीत कोसळून 25 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेश: ट्रक नदीत कोसळून 25 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यांत लग्नाच्या वहाऱ्डाला घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीररित्या जखमी झालेत. वहाऱ्डी मंडळींनी खच्चून भरलेला हा ट्रक पुलावरुन थेट सन नदीपात्रात कोसळला.

हा ट्रक 60 ते 70 फूट खोल नदीपात्रात कोसळला. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version