बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अभिनेत्री प्रीती जैन दोषी

बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अभिनेत्री प्रीती जैन दोषी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बॉलिवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी शुक्रवारी अभिनेत्री प्रिती जैन आणि अन्य दोघांना न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आले.

 

2005 साली प्रीती जैन हिने मधुर भांडारकरला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप होता. तिच्यावरील हा आरोप सिद्ध झाला असून न्यायालयाने तिला तीन वर्षांच्या कारावासाची

शिक्षा सुनावली.

 

यावेळी न्यायालयाने या प्रकरणातील अन्य दोन जणांची निर्दोष मुक्तताही केली.  सरकारी पक्षाच्या वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, प्रीती जैन हिने अरूण गवळीचा सहकारी नरेश परदेशी

याला सप्टेंबर 2005 मध्ये मधुर भांडारकर याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version