ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचे निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचं आप्रदीर्घ आजारानं मुंबईतल्या राहत्या घरी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.

 

मुत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते. मधुकर तोरडमल यांना काही दिवसांपूर्वी एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.

 

मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले.

 

पण, शुक्रवार रात्रीपासून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली.

 

अखेर आज त्यांनी वांद्रे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

 

तोरडमल यांनी तरुण तुर्क म्हातारे अर्क, गुड बाय डॉक्टर, बॅरिस्टर सारख्या नाटकांमधून काम केले, तर सिंहासन, बाळा गाऊ कशी अंगाई, आपली माणसे अशा मराठी

चित्रपटांमधून भूमिका साकारल्या होत्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version