LPG Booking Rules: गॅस कंपन्यांकडून ग्राहकांना मोठा इशारा; वितरण नियमांमध्ये केले हे बदल, आता थेट…

एलपीजी सिलेंडरच्या फसव्या वितरणांना रोखण्यासाठी आता डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) अनिवार्य करण्यात आला आहे.
LPG Booking Rules: गॅस कंपन्यांकडून ग्राहकांना मोठा इशारा; वितरण नियमांमध्ये केले हे बदल, आता थेट…

सध्या देशावर इंधन टंचाईचं सावट आहे. मात्र याचा परिणाम थेट स्वयंपाकघरावर होत आहे. सध्या एलपीजीबद्दल मोठ्या प्रमाणात नियमावली जारी करण्यात येत असतात. अशातच आता नविन नियमावली जारी करण्यात आली आहे. एलपीजी सिलेंडरच्या फसव्या वितरणांना रोखण्यासाठी आता डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) अनिवार्य करण्यात आला आहे. 100 टक्के वितरण त्याच माध्यमातून केले जाईल. त्यामागील महत्वाच्या उद्देश हा आहे की, सिलेंडर योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवणे आणि ते पोहोचले की नाही याची माहिती घेणे. ज्यामुळे सिलेंडरचा काळाबाजार रोखला जाऊ शकतो. 

संबंधित काळा बाजार रोखण्यासाठी एच पी गॅसकडून  सोशल मीडिया एक्सवर खास ग्राहकांना इशारा देत पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये एचपी गॅसने म्हटले की, एलपीजी सपोर्ट एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवणारे खोटे कॉलर, बुकिंग कन्फर्मेशन, केवायसी अपडेट आणि सिलेंडरची लवकर डिलिव्हरी मिळवण्याकरिता डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड शेअर करण्यास सांगतात.त्याचवेळी आपण लगेचच ओटीपी शेअर करतो आणि हा ओटीपी चुकीच्या ठिकाणी पोहोचला तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. 

 ओटीपीमुळे होणारी फसवणूक कशी टाळता येईल? याबद्दल जाणून घेऊया. 

– कधीही तुम्ही फोन कॉलवर ओटीपी शेअर करू नका. 
– कोणतीही गॅस कंपनी ओटीपी मागत नाही
– सिलेंडर दारात पोहोचेपर्यंत तुमचा डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड कधीही शेअर करू नका. 

गॅस सिलेंडर कंपनीतून बोलत असल्याचे भासवून ग्राहकांची मोठ्या संख्येने फसवणूक होत असल्याने निर्देशनास येत आहे. सर्रासपणे ग्राहकांचे ओटीपी विचारले जात आहेत. यादरम्यानच आता थेट ग्राहकांना मोठा इशारा देण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून देशात एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे. त्यामध्येच आता हा इशारा ग्राहकांना देण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version