अमर प्रेम; ‘त्यांना’ मृत्यूही विभक्त करू शकला नाही – थक्क करणारी Love Story

अमर प्रेम; ‘त्यांना’ मृत्यूही विभक्त करू शकला नाही – थक्क करणारी Love Story

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मी तुझ्या शिवाय जगूच शकत नाही, अशी वाक्य आजची युवा पिढीच्या तोंडातुन येतच असतात, मात्र मीरारोडमधल्या एका वृध्द प्रेमी युगुलाने हे वाक्य बोलन नाही तर कृतीतुन सिध्द करुन दाखवलंय.

मीरा रोडमधल्या शंभरी पार केलेल्या एका जोडप्याला मृत्यूही विभक्त करू शकला नाही. एकमेकांच्या प्रेमाखातर बांधलेली लग्नगाठ मृत्यूनंतरही सोडायची नाही, अशी खूणगाठ बांधलेल्या या जोडप्याचा मृत्यू एकाच दिवशी अगदी काही तासांच्या अंतराने झाला.

 107 वर्षीय नाथुजी राठोड यांचे सोमवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास निधन झाले आणि त्यांचा विरह सहन न झालेल्या त्यांच्या पत्नी 103 वर्षीय नसीबन राठोड यांनीही काही तासांतच आपला देह ठेवला.

या दोघांची अंत्ययात्रा एकत्रच काढण्यात आली. मीरा रोडच्या दफनभूमीत दोघांना एकमेकांच्या शेजारीच दफन करण्यात आले.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version