लाँग मार्च, शेतकऱ्यांच्यां मोर्च्याचा आजचा मुक्काम भिवंडीत

लाँग मार्च, शेतकऱ्यांच्यां मोर्च्याचा आजचा मुक्काम भिवंडीत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

हजारोंच्या संख्येने निघालेला हा लाँग मार्च 12 मार्चला विधीमंडळावर धडक देणार आहे.
कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला डाव्यांचा नेतृत्त्वातील किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे.

वाशिंद जवळील पडघा इथं हा मोर्चा दाखल झाला आहे. त्यांचा आजचा मुक्काम भिवंडी इथं असेल.

याआधी राज्यातल्या शेतकऱ्यांनी संप पुकारुन सरकारविरोधातला आपला रोष व्यक्त केला होता. त्यानंतर सरकारनं 35 हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र त्यातून फारसं कुणाच्या हाती काही लागलं नाही, अशी तक्रार समोर येत होती.
जोवर मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोवर विधीमंडळाला घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकार पाठीशी उभे राहत नसल्यान शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. सरकारने दिलेली कर्जमाफीही फसवी असल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किसान सभेने मोर्चाचे हत्यार उपसालं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version