लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत लोकशाहीचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं आहे. रोज पेरू विकून आपली रोजीरोटी चालवणारी, सर्वसामान्य कुटुंबातील एक महिला आज लोकांच्या विश्वासावर भाग्यश्री जगताप नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. सकाळ-दुपार पेरू विक्री करून संसाराचा गाडा हाकायचा आणि संध्याकाळी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार करायचा हा संघर्ष, कष्ट आणि जिद्दीचा हा प्रवास आज विजयात बदलला आहे.
आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे दिलेल्या संधीला जनतेने ठाम कौल दिला आणि लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. हा विजय केवळ एका महिलेचा नाही, तर संविधानावर, मताच्या शक्तीवर आणि सामान्य माणसाच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा विजय आहे. त्यामुळेच आज या पेरू विकणाऱ्या भाग्यश्री जगताप यांच्या ऐतिहासिक विजयाचं मावळ तालुक्यात सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.