जय महाराष्ट्र न्यूज, लोणावळा
लोणावळा नगरपरिषदेच्य नविन प्रशासकिय इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्य़ात आलं. यावेळी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरिष बापट, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारेही उपस्थित होते.
21 कोटी रुपये खर्च करुन ही इमारत बांधण्यात आली. या इमारतीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी,सर्व सभापती आणि सर्व विभागांसाठी प्रशस्त कक्ष देण्यात आलेत. सर्व इमारतीत आधुनीक यंत्रणा वापरण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागात ही इमारत असल्याने नागरिकांना तुंगार्ली येथिल कार्यालयात जाण्यासाठी होणारा मनस्ताप आता कमी होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.