लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. देशाभरात चौथा टप्पा आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. महाराष्ट्रात एकूण 57 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. तर संपूर्ण चार टप्प्यात एकूण 61 टक्के मतदान झाले आहे. कल्याणमध्ये सर्वात कमी मतदान झाल्याचेही निवडणूक आयोगाने सांगितले. चौथ्या टप्प्यात देशात 64 टक्के मतदान पार पडले आहे.
देशासह राज्यात चौथा टप्पा पार पडला असून 2014 प्रमाणे मतदान झाल्याचे राज्या निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
आज पार पडलेल्या चौथ्या टप्प्यात एकूण 57 टक्के मतदान झाले.
तसेच चारही टप्प्यात झालेले मतदान 61 टक्के झाले आहे.
गडचिरोलीत 72 टक्के मतदान झाल्यामुळे सर्वाधिक मतदान झाल्याची माहिती दिली आहे.
तर सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये झाल्याचे समजते आहे.
कल्याणमध्ये फक्त 44 टक्के मतदान झाल्याचे समजते आहे.
तसेच बॉलिवूड कलाकारांनी मोठ्या संखेने मतदानाला हजेरी लावली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.